Posts

SMALL NOTE ON RERA: FIRM STEP TOWARDS PREVENTION OF BLACK MONEY Govt of India passed RERA Act in both houses of parliament during the last year. As per the law, Govt of Maharshtra took quick action to enact rules and Authority under RERA Act. For the first time ever, specific law has been actually enacted in this country to regulate most undisciplined sector ie Real Estate which is also called as safe heaven for black money. Coming to the point, RERA act has been enacted with two basic purpose-: 1. To bring transparency in the Real Estate Sector 2. To protect interest of the innocent buyer. Most important thing about this act is that it has fixed specific responsibilities on three professionals viz. Architect, Engineer & Chartered Accountant. These professionals are expected to provide certificates in specific format giving information about progress of the project and financial discipline. Second important thing is that most of the information submitted with RERA a

लोकसत्ता संपादक गिरीश कुबेर यांना नोटबंदीसंदर्भात अनावृत्त पत्र

मी लोकसत्ताचा गेली कित्येक वर्षे नियमित वाचक आहे . स्वतंत्र व निर्भीड बाण्याच्या पत्रकारितेची उज्ज्वल परंपरा लोकसत्ताने जोपासली आहे . आपल्यासारख्या व्यासंगी आणि स्थलकाल परिस्थितीचे अचूक भान असणाऱ्या संपादकाचे अग्रलेख , ' अन्यथा ' सारखी इतर सदरे म्हणजे बौद्धिक मेजवानीच . मराठी वाचकाला सोप्या शब्दात आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारण समजावून सांगण्याची आपली हातोटी विलक्षण वाखाणण्याजोगी . परंतु मागील काही दिवसांपासून आपल्याकडून वारंवार अपेक्षाभंग होत असल्याने काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणून द्याव्याशा वाटतात . आपल्या मा . पंतप्रधानांनी निश्चलनीकरणाचा निर्णय घेतल्यावर आपण त्यांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत कराल अशी आमची अपेक्षा होती . आपल्या विविध अग्रलेखांच्या माध्यमातून आपण पंतप्रधानांकडून आर्थिक सुधारणांची अपेक्षा व्यक्त केली होती . परंतु निश्चलनीकरणासारखे अत्यंत ठाम व धाडसी पाऊल उचलल्यानंतर दि . ९ नोव्हेंबरच्या विशेष संपादकीयमध्ये आपण चक्क या गोष्टीचा काळा पैसा बाहेर य

सोयीचा राष्ट्रवाद व धर्मनिरपेक्षता

मागील संपूर्ण आठवडा देशभरात गाजवला तो एका विद्यापीठाने . वास्तविक पाहता माध्यमातील जागा व्यापणे हे खरे तर सिनेमातील नट , नट्या , राजकारणी , खेळाडू , झालेच तर काही वलयांकित समाजसेवक यांचा हक्क . आपल्या   देशात विद्यापीठाने स्थान मिळविणे हि खरे तर दुर्मिळ बाब . पण हे झाले . काहींच्या मते जेएनयू मधील लढाई हे म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी   लढले जाणारे युद्ध . तर काहींसाठी भारताच्या राष्ट्ररचनेवरील घाला . तर बरेचसे लोक हे जेएनयू या शब्दापासून अनभिज्ञ . तेथे काही देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या , इतकेच काय ते सामान्य माणसाला वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून कळाले . पण जेएनयू म्हणजे काय , व असे या विद्यापीठाच्या प्रांगणातच का घडले , हे मात्र बऱ्याच जणांना माहित नाही . जेएनयू अर्थात " जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची " स्थापना १९६९ साली संसदेच्या कायद्यान्वये झाली . आजघडीला NAAC कडून देशात सर्वात जास्त नामांकन मिळवणारे हे एक विद्यापीठ आहे . देशभरातील सर्वोत्तम व हुशार विद्यार्थी या