लोकसत्ता संपादक गिरीश कुबेर यांना नोटबंदीसंदर्भात अनावृत्त पत्र
मी लोकसत्ताचा गेली कित्येक वर्षे नियमित वाचक आहे . स्वतंत्र व निर्भीड बाण्याच्या पत्रकारितेची उज्ज्वल परंपरा लोकसत्ताने जोपासली आहे . आपल्यासारख्या व्यासंगी आणि स्थलकाल परिस्थितीचे अचूक भान असणाऱ्या संपादकाचे अग्रलेख , ' अन्यथा ' सारखी इतर सदरे म्हणजे बौद्धिक मेजवानीच . मराठी वाचकाला सोप्या शब्दात आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारण समजावून सांगण्याची आपली हातोटी विलक्षण वाखाणण्याजोगी . परंतु मागील काही दिवसांपासून आपल्याकडून वारंवार अपेक्षाभंग होत असल्याने काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणून द्याव्याशा वाटतात . आपल्या मा . पंतप्रधानांनी निश्चलनीकरणाचा निर्णय घेतल्यावर आपण त्यांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत कराल अशी आमची अपेक्षा होती . आपल्या विविध अग्रलेखांच्या माध्यमातून आपण पंतप्रधानांकडून आर्थिक सुधारणांची अपेक्षा व्यक्त केली होती . परंतु निश्चलनीकरणासारखे अत्यंत ठाम व धाडसी पाऊल उचलल्यानंतर दि . ९ नोव्हेंबरच्या विशेष संपादकीयमध्ये आपण चक्क या गोष्टीचा काळा पैसा बाहेर य...