Posts

Showing posts from April, 2016

सोयीचा राष्ट्रवाद व धर्मनिरपेक्षता

मागील संपूर्ण आठवडा देशभरात गाजवला तो एका विद्यापीठाने . वास्तविक पाहता माध्यमातील जागा व्यापणे हे खरे तर सिनेमातील नट , नट्या , राजकारणी , खेळाडू , झालेच तर काही वलयांकित समाजसेवक यांचा हक्क . आपल्या   देशात विद्यापीठाने स्थान मिळविणे हि खरे तर दुर्मिळ बाब . पण हे झाले . काहींच्या मते जेएनयू मधील लढाई हे म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी   लढले जाणारे युद्ध . तर काहींसाठी भारताच्या राष्ट्ररचनेवरील घाला . तर बरेचसे लोक हे जेएनयू या शब्दापासून अनभिज्ञ . तेथे काही देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या , इतकेच काय ते सामान्य माणसाला वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून कळाले . पण जेएनयू म्हणजे काय , व असे या विद्यापीठाच्या प्रांगणातच का घडले , हे मात्र बऱ्याच जणांना माहित नाही . जेएनयू अर्थात " जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची " स्थापना १९६९ साली संसदेच्या कायद्यान्वये झाली . आजघडीला NAAC कडून देशात सर्वात जास्त नामांकन मिळवणारे हे एक विद्यापीठ आहे . देशभरातील सर्वोत्तम व हुशार विद्यार्थी या ...